सुरगाणा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील गुजरात सीमेवरील कुकूडणेमध्ये दारू बंदीसाठी आदिवासी महिला आक्रमक झाल्यात.. गावात दारू बंदीसाठी करण्यासाठी आदिवासी महिलांनी रुद्रावतार घेत ग्रामसभेत ग्रामसेवकासह सरपंच आणि अन्य लोकप्रतिनिधींना धारेवर धरल्यानं सर्वाचीचं बोबडी वळाली. गावातील देशी दारूचं दुकान कोणतीही पूर्वपरवानगी न घेता सुरू करण्यात आल्याचा आरोपही गावातील महिलांनी केलाय. कुकूडणे हे गाव आदिवासी पेसा क्षेत्रात येत असून देशी दारूचे दुकान सुरू झाल्यापासून गाव परिसरात भीतीचं वातावरण तयार झालय. रात्री-अपरात्री महिलांना घराबाहेर पडणं मुश्कील झालय. देशी दारूमुळे गावात व्यसनाधिनतेचं प्रमाण वाढले असून अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. त्यामुळे हे देशी दारूचे दुकान तात्काळ बंद करण्यात यावं, अशी मागणी गावातील महिलांनी केलीय.
#Sakal #Nashik #BreakingNewsToday #DaruBandi #Sharab #AlcoholFormula #ThackerayGovernment #UddhavThackeray #DevendraFadnavis #BJPMaharashtra